Posts

Showing posts with the label Marathi

दिल की चाहत

दिल की चाहत कल भी तुम थे आज भी तुम हो मेरी ज़रूरत कल भी तुम थे आज भी तुम हो तुमने तो मुझे कबका भुला दिया मेरी आदत कल भी तुम थे आज भी तुम हो तुमने न जाना कितना तुमको प्यार किया मेरी इबादत कल भी तुम थे आज भी तुम हो बेखबर बनते हो खबर हो के भी मेरी किस्मत कल भी तुम थे आज भी तुम हो

एका मेक़्यनिकचा प्रेमयोग

तू एक मृगजळ या काव्य संग्रहातून   तिच्या नजरेची हेडलाईट माझ्या नजरेशी मिळाली माझ्या मनाच्या टायरची हवाच ढिल्ली झाली तिच्या होकाराच्या पाण्याने आमच्या प्रेमाचा नटबोल्ट आवळला आमच्या वचनांचा पेट्रोल टेंक आम्ही गदागदा ढवळला

लव्हलेटर.......

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं

What girlfriend think about boyfriend?

बॉयफ्रेंड म्हणजे काय असतो..??  फावल्या वेळेतला एन्जॉय असतो..  फुकट खेळायचा toy असतो..  वाईट वागले तरी nice guy असतो..  आशिकी मधला राहुल रॉय असतो..  बॉयफ्रेंड चा काय त्रास असतो ...??  सतत लक्ष ठेवणारा पजेसीव बॉस असतो..   हाताने करून घेतलेला फ्रीडमचा लॉस असतो ..  सरळ साध्या प्रश्नांवर रिप्लाय क्रॉस असतो..  लग्न करायच्या निर्णयावर कायमच toss असतो...     शेवटी गर्लफ्रेंडचा तो फक्त टाईमपास असतो..   

निबंध :- माझा आवडता पक्षी

मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात. कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे. कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात. कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो. कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला "बर्ड फ्यु" का असेच काहीतरी नाव इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खुप ताप होतो. कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. नाना पाटेकरचा पक पक पकाक असा सिनेमा आहे. भरत जाधवचा पण जत्रा नावाचा कोंबडीवर सिनेमा आहे. तो मात्र अतिशय वाईट होता. सिनेमा बघणे वाईट असते असे मोठी माणसे सांगतात पण मला सिनेमा पाहणे आवडते.